कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी उद्योगधंदे संलग्न कार्य- क्रमांतर्गत कार्यरत असलेली कृषी महाविद्यालय नंदुरबार येथे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कृषिकन्या स्वाती बाळू गोरवे हिने कृषीविषयक उपक्रम राबवून आहेरगाव-भुईंजेच्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांची माहिती दिली.
आहेरगाव-भुईंजे येथे कृषी कन्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय नंदुरबारचे प्राचार्य डॉ. एस.बी.खरबडे, सहयोगी प्राचार्य आर.एम.बिराडे, अध्यक्ष डॉ.एस.यु.बोराळे, डॉ. पी.पी. गिरासे तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.बी.सूर्यवंशी, डॉ. डी.बी.अहिरे व महाविद्यालयाच्या इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमामध्ये कृषिकन्या स्वाती गोरवे हिने मातीपरिक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा, शेतातील तणव्यवस्थापन, फवारणी यंत्र हाताळणी, बागायती पिकांची देखभाल, बियाणे उगवण चाचणी तसेच शेतीविषयक ॲप्स मोबाईल मध्ये डाऊनलोड करून हवामान व शेतीविषयक माहिती कशाप्रकारे मिळवता येईल यासाठी विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन केले व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ व तरुणवर्ग उपस्थित होता.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount