कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा ४४ वा वर्धापन बार्शी येथे ४ सप्टेंबर शनीवारी महावितरणच्या विभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघटनेचे सरचिटणीस देवकांत व केंद्रीय पदाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित केले होते. यावेळी विभागातील एकूण ५६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे वर्धापनदिनी रक्तदान शिबिर
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रभारी कार्यकारी अभियंता धनराज भारती यांच्या हस्ते व व्यवस्थापक राजेंद्र सावंत, सहाय्यक अभियंता घोलप, कनिष्ठ अभियंता झिंगाडे, प्रमोद गरड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सध्या करोनाच्या काळामध्ये सर्वत्र रक्ताची गरज असून संघटनेने वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक धनराज भारती यांनी केले. याप्रसंगी संघटनेचा इतिहास संघटनेचे विभागीय सचिव सतीश पाटील यांनी प्रस्तावने व्दारा सांगितला.
सोलापूर मंडळाचे सहसचिव आर. एम. नेंदाने यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पदाधिकारी बारामती परिमंडळ अध्यक्ष ओंकरणाथ गाये, डी. बी. लिंगायत, सोमेश्वर होनराव, एस डी आगळे, रमेश जगदाळे, बळीराम कदम, भारत भोसले, अप्पासाहेब घायतीडक, अमर धस, अमित कोष्टी व इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना कामगारांचे हित जोपासत न्याय तर देतच त्याबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर, कोरोना निधी, पूरग्रस्त निधी या सारखे उपक्रम वेळोवेळी करत आहे.- सतीश पाटील, विभागीय सचिव, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन बार्शी.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount