कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी ते पांगरी हा नऊ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. कारी बस स्थानकापासून ते ६ किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना खड्यातूनच वाट शोधत प्रवास करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. रात्रीच्या वेळी तर वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कारी-पांगरी रस्त्याची दुरवस्था; वाहनधारकांचा खड्ड्यातून प्रवास
नागरिकांना बार्शी बाजार पेठेत जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. मालवाहतूक ही येथूनच होते. रस्त्यावरील रहदारीमुळे रस्ता सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी दुतर्फा बाजूने खचला असून रस्त्याची खडी निघून गेली आहे. जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागासह, लोकप्रतिनिधी चे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकासह नागरिकांतून होत आहे.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount