fbpx

चोरी दरोड्याच्या घटनेत मिळणार तत्काळ मदत, चोर दरोडेखोर होणार जागेवर जेरबंद

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : चोरी, दरोडे थांबविण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीसाठी काही ना काहीतरी शोध लावलेला आहे, असे प्रतिपादन ग्रामसुरक्षा दलाचे संचालक डी.के. गोरडे यांनी केले. ते पांगरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य यांच्यासाठी पुरी ता. बार्शी येथील झाडबुके कॉलेजमध्ये आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, प्राचार्य प्रमोद गिलबिले, पुरीचे सरपंच अमर पवार, विलास लाडे, रमेश चौधारी, अमोल रानमाळ आदी उपस्थित होते.

पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर १८००२७०३३६०० वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री. डी. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले. उपस्थित सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी केले.

गेल्या ९ वर्षांत पुणे, नाशिक, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील ३५०० हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये

  • संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
  • गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
  • संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर १८०० २७० ३६००
  • यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
  • संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
  • दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
  • नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात.
  • नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
  • एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
  • वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
  • घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते.
  • संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
  • चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप ब्लॅक लिस्ट होतात.
  • गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
  • सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा !  या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *