fbpx

चांदणी नदीला पूर मांडेगांवचा संपर्क तुटला; बार्शी, मांडेगाव, देवळाली, भूम रस्ता बंद

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: पावसाच्या संततधारेमुळे बार्शी तालुक्यातील मांडेगाव या गावाचा संपर्क तूटलेला असून बार्शी, मांडेगाव, देवळाली, भूम रस्ता बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. मांडेगावच्या शेतकऱ्याचे सोयाबीन व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीला पूर आल्यामुळे ओढ्याचे पाणी गावात शिरले गावातील बऱ्याच घरांची पडझड झाली आहे तरी प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी सरपंच पंडित मिरगणे यांनी केली आहे.

बार्शी तालुक्यात पडणाऱ्या सतत पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. तूर पिवळी पडली तर सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे, काढणीस आलेल्या उडीद जागेवरच वाफल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाय योजना करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *