कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा बार्शीच्या वतीने खांडवी येथील सोजर फार्मसी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण गटविकास अधिकारी शेखर सावंत, संत निरंकारी मंडळाचे चांदभाई तांबोळी, नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सोजर फार्मसी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण
याप्रसंगी गटविकास अधिकारी सावंत म्हणाले की, सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेव जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने वृक्षारोपण हे महान परोपकाराचे कार्य संत निरंकारी मंडळाचे अनुयायी करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने ऑक्सिजन निर्मितीचे काम मंडळ करत आहे,.
संत निरंकारी मंडळाचे चांदभाई तांबोळी म्हणाले, संत निरंकारी मंडळ हे परोपकाराचे कार्य २५ मे १९२९ सालापासून करत आहे. या वर्षी सोलापूर झोनमध्ये ७ हजार पेक्षा जास्त वृक्षारोपण व २ हजार पेक्षा जास्त रक्तदान मंडळाने केले आहे. या कार्यक्रमासाठी रमेश पाटील, अरुण बारबोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सेवादल संचालक किशोर ढोले, सेवादल शिक्षक ऋषिकेश शेळके, सेवादल टीम व बबन गवळी, राजेंद्र चव्हाण, संगीता भोसले, सुरेखा बचुटे, सोमनाथ पवार, गणेश उमाप, गोविंद कसबे,उत्तम कावरे, प्राचार्य करपे, प्राचार्य करडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना राजेंद्र चव्हाण, सूत्रसंचालन विक्रम क्षीरसागर व आभार विठ्ठल बचुटे यांनी मानले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount