fbpx

भारत बंद- बार्शीत कम्युनिस्ट पक्षाकडून पोस्ट चौकात रस्ता रोको

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: देशात २७ सप्टेंबर २०२१ रोजी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने बार्शी पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन कॉम्रेड प्रविण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा, स्वामीनाथन आयोग, २०१९-२० चा पिक विमा, २०१९ चा दुष्काळ निधी, पिक कर्ज, परदेशी सोयाबीनचे आयात बंद करून २००२१ च्या अतिवृष्टी चे नुकसान भरपाई द्या, शेतीस दिवसा वीज पुरवठा व्हावा, घरेलू कामगार, बांधकाम कामगार यांच्या मागण्या पूर्ण करा, कोरोना काळात वीजबिल माफ करा, सात हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला पेन्शन, एकवीस हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला किमान वेतन करा, आधारभूत किमत मिळण्याचा शेतकऱ्यांना अधिकार द्या, कोविड काळातील शैक्षणिक फीस माफ करा, पेट्रोल डीझेल दरवाढ रद्द करा, सार्वजनिक उद्योगांची कवडीमोल विक्री बंद करा या मागण्या पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आले आहेत हे निवेदन नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी स्विकारले.
यावेळी झालेल्या भाषणामध्ये मोदी सरकारचा निषेध करून तीन कृषी कायदे मागे घ्यावे व शेतकरी वर्गाच्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रवीण मस्तुद, आयटकचे कॉम्रेड ए.बी.कुलकर्णी, अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड लहू आगलावे, नागजी सोणवणे, भारत भोसले, उंबरे अण्णा, लक्ष्मण घाडगे, सरिता कुलकर्णी, अनिरुद्ध नखाते, शौकत शेख, आनंद गुरव, शुभम शिंदे, बालाजी शितोळे, आनंद धोत्रे, भारत पवार, भारत चव्हाण, सोमनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *