fbpx

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आमदार कैलास पाटील

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील आंबेजवळगा, घाटंग्री, पळसप, भिकार सारोळा, मोहतरवाडी आदी गावांना सोमवार दि. २७ रोजी आमदार कैलास पाटील यांनी भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. संकट काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, माजी उपसभापती शाम जाधव, विभागप्रमुख राजेंद्र तुपे, मोहतरवाडी सरपंच राजाभाऊ पाडुळे, जुणोनीचे माजी सरपंच अमोल मुळे, बापू थोरात, दिपक सरडे, अक्षय नाईकवाडी, आबा सरडे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

‘कुतूहल’ च्या पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये   200 रुपये   500 रुपये   Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *