कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाला शिक्षण उपसंचालक (पुणे विभाग) औदुंबर उकिरडे, बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बनसोडे यांनी भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने औदुंबर उकिरडे यांचा प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांनी तर अनिल बनसोडे यांचा उपप्राचार्य ए. डी. सुर्वे यांनी सत्कार केला.
शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली झाडबुके महाविद्यालयाला भेट
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील खराडे यांनी केले. याप्रसंगी उकिरडे यांनी मी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमानाने उल्लेख करत महाविद्यालयीन जीवनातील स्मृतींना उजाळा देत महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. मनोज गादेकर, बार्शी टेक्निकल हायस्कूलचे मुख्याध्यापक टकले, महाविद्यालयातील कला आणि विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. साजीद शेख यांनी तर आभार उपप्राचार्य ए. डी. सुर्वे यांनी मानले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount