प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून ३०० मुलांना नवीन कपडे, चप्पल, टॉवेल व फराळाचे वाटप.
शेतकरी आत्महत्याग्रस्त, वंचित, निराधार, भिक्षा मागणाऱ्या मुलांची दिवाळी गोड
कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर: दिवाळी ही प्रत्येकासाठीच आनंद देणारी असते. पण आज ही समाजात अनेक घटक असे आहेत की त्यांना या आनंदापासून वंचित रहावं लागतंय. वंचितांची ही दिवाळी गोड व्हावी यासाठी गेली पाच वर्षे झाले प्रार्थना फाऊंडेशन प्रयत्न करत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त, वंचित, निराधार, भिक्षा मागणाऱ्या मुलांची तसेच वृद्धाश्रमातील वयोवृद्ध आजी आजोबांची दिवाळी गोड व्हावी त्यांना ही सणाचा आनंद घेता यावा या हेतूने संस्थेच्या माध्यमातून ३०० मुलांना नवीन कपडे, चप्पल, टॉवेल, फराळ देऊन या मुलांची दिवाळी गोड करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, आजची ही छोटी मुलं उद्याच्या देशाचे भविष्य आहेत. प्रार्थना फाऊंडेशन माध्यमातून समाजातील वंचित, निराधार, भिक्षा मागणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न आहे तो कौतुकास्पद आहे. या सर्व मुलांना दिवाळीचा आनंद घेता यावा या साठी आयोजित कार्यक्रमात मला सहभागी होता आल याचा मनस्वी आनंद आहे. ही मुले पुढे जाऊन नक्कीच काहितरी करून दाखवतील असा विश्वास व्यक्त केला.
मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून मुलांसाठी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच अंबादास कनकट्टी यांनी पक्ष्यांचे विविध आवाज काढून मुलांचे मनोरंजन करण्यात आले. यावेळी अरुण जोशी, योगीन गुजर, विजय जाधव, महेंद्र होमकर, प्रज्ञा सतापूरकर, संस्थेच्या सचिव अनु मोहिते, मेहुल भुरे, सचिन जगताप, शेखर दिवसे, संजय कोंढरे, वासुदेव व्हटकर, प्रसाद मोहिते, राहुल मांजरे,अंबादास कनकट्टी आदी उपस्थित होते. मुलांची दिवाळी गोड व आनंदमय होण्यासाठी समाजातील दानशूर नागरिकांनी मदत केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोविंद तिरनगरी, मुकेश जमादार, सिद्रय्या पाटील, शुभम मिसाळ, रोहित कोळेकर, राहुल बिराजदार, भाग्योदय इपोळे, मल्लेश तेली आदींनी परिश्रम घेतले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount