कुतूहल न्यूज नेटवर्क
कै शशिकांत गोरख बगाडे क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ पांगरी या संस्थेच्या वतीने गरजूंना धान्य वाटप
पांगरी : कै शशिकांत गोरख बगाडे क्रीडा आणि संस्कृती मंडळ पांगरी या संस्थेच्या वतीने सोमवार दि.4 रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून जवळपास 100 गरजू व्यक्तींना प्रत्येकी 10 किलो धान्याचे वाटप सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करुन करण्यात आले तसेच या संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या राजीव गांधी केंद्रीय निवासी आश्रम शाळेतील मुलांना सध्या लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात आलेले होते. त्यामुळे सदर मुलांच्या उदरनिर्वाहाची अडचण होत असल्यामुळे त्यांच्या पालकांनी धान्य देण्याची विनंती केलेली होती त्यांच्या विनंतीचा मान राखून या संस्थेचे संस्थापक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजीव बगाडे यांनी सदरील विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी दहा किलो धान्य वाटप केले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष माजी जि.प. सदस्य प्रा. संजीव बगाडे, उपाध्यक्षा सुलभा जगताप, मुख्याध्यापिका किरण बगाडे, उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे,अधीक्षक वाहिद शेख, प्रा. वजीर मुलानी,अनिल कुमार जगताप व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.