कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी येथील महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न बार्शी शहर व तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सन २०२२ सालच्या दिनदर्शिका मुद्रित करण्यात आली आहे. श्रीधर उर्फ दादा अंधारे, मेंदूतज्ञ डॉ.अमित पडवळ, दिव्य मराठीचे युनिट हेड नौशाद शेख यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे सावळे आण्णा सभाग्रह येथे रविवारी रात्री प्रकाशन करण्यात आले.
बार्शी: बार्शी येथील महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न बार्शी शहर व तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सन २०२२ सालच्या दिनदर्शिका मुद्रित करण्यात आली आहे. श्रीधर उर्फ दादा अंधारे, मेंदूतज्ञ डॉ.अमित पडवळ, दिव्य मराठीचे युनिट हेड नौशाद शेख यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे सावळे आण्णा सभाग्रह येथे रविवारी रात्री प्रकाशन करण्यात आले.
यावेळी दिव्य मराठीचे वृत्तसंपादक श्रीकांत कांबळे, शेतीमित्रचे संपादक प्रमोद पाटील, रोटरीचे अध्यक्ष विक्रम सावळे, उद्योजक संदिप नागणे, संकेत खांडवीकर, संस्थेचे अध्यक्ष सचिन उर्फ बंटी बाबर, सचिव ताहेर काझी, कार्याध्यक्ष शाम थोरात, संदेश घाडगे, शहाजी फुरडे आदी उपस्थित होते.

नौशाद शेख म्हणाले, बार्शीच्या लोकांना नेहमी काहीतरी करण्याची सवय असल्याने त्याचा अभिमान वाटतो. बार्शीतील वृत्तपत्र संघटना ही महाराष्ट्रातील मोठे काम करणारी संघटना आहे. ज्यांना वाचता येते आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांनाही कॅलेंडर समजून येते हे त्याचे वैशिष्ट्य प्रत्येकाने अनुभवले आहे. श्रीकांत कांबळे म्हणाले, ज्ञानकर्मी लाेकांनी निर्माण केलेले साहित्य, समाजप्रबोधन, परिवर्तन विचार असो वा कोणत्याही घटनेचे वृत्त आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम असो ते वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून सातत्याने केले गेले आहे. शेकडो वर्षांपासून होत असलेल्या या कार्यातून सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याचे हे काम अविरत केले गेले. एखादी वृत्तपत्र संघटना असे काही तरी कंटेनचे काम करते हे खूप महत्वाची बाब आहे, भिंतीवरील दिनदर्शिका ही संस्कृतीचे वाहक असते, आता मिक्स संस्कृती जन्माला आल्या आहेत. वृत्तपत्र व्यवसायासाठी टिमवर्क आणि अनेकांचे योगदान लाभत असल्याने या सेवेतील सातत्य आहे.
श्रीधर अंधारे म्हणाले, सतरा वर्षांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी निर्माण झाली आहे. वृत्तपत्रासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सदस्यांमुळे वेळोवेळी आवश्यक असलेले संदेश प्राप्त होत असून, त्यांच्याकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण सेवेमुळे वाचनाची गोडीही लागते. डॉ.अमित पडवळ म्हणाले, वृत्तपत्र हा झीरो एररचा व्यवसाय असून यात शून्य टक्के चूका होतात, वृत्तपत्र विक्रेत्यांकडून स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीस ग्रामदैवत श्री भगवंताच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदस्यांनी परिश्रम घेतले. सोमेश्वर देशमाने यांनी सूत्रसंचलन केले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount