कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेच्या बार्शी शाखेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन संघटनेचे लातूर युवक जिल्हाध्यक्ष रोहित थोरात, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष सतीश क्षिरसागर, उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष दिनेश पलंगे, बार्शी खाटीक समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव जठार, माजी नगरसेवक राजाभाऊ घोलप, वैरागचे ज्येष्ठ समाजसेवक रामभाऊ थोरात, आबासाहेब थोरात, डॉ. राहुल ताटे व बार्शी तालुका युवक अध्यक्ष गणेश घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.
बार्शीत हिंदू खाटीक समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यासह नगराध्यक्ष ॲड. असिफभाई तांबोळी, पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठोंगे व पत्रकार बांधव उपस्थित होते. अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेच्या बार्शी तालुका युवक अध्यक्षपदी गणेश घोलप यांची निवड झाल्याबद्दल स्नेहमेळावा व नवीन वर्षाची दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन सोहळा स्व.रमजानभाई तांबोळी सभागृह येथे बुधवारी पार पडला.निवड झाल्याबद्दल गणेश घोलप यांचा समाज बांधव, पत्रकार बांधव व मित्रपरिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी जगन्नाथ खडके, ऋषिकेश ताटे, दिलीप थोरात, विजय खडके, आनंद कांबळे, गोविंद ताटे, शिवम थोरात, अरुण काथवटे, गिरीष थोरात, आनंद टोणपे, सूर्यकांत धाकपाडे, हेमंत कांबळे, जितेंद्र फिस्के, गणेश कांबळे, अनिल घोडके, राजेंद्र काथवटे, रामेश्वर कोथिंबिरे, राजेंद्र ताडे, नागेश काथवटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल जमदाडे, बापु थोरात, सागर कांबळे, नागेश घोलप, भैय्या फिस्के, जितेंद्र फिस्के, बालाजी जठार,विष्णू जठार, गणेश कांबळे, राहुल घोलप, सचिन घोलप, गिरीष कांबळे,अमोल घोडके, बालाजी जठार, विकी जमदाडे, अमोल घोलप, मंगेश कांबळे, भारत फिस्के, गोविंद घोलप, ऋतिक पलंगे, ओमकार घोलप,अरविंद ताडे, सचिन जमदाडे, सचिन खडके, शंकर घोणे आदींसह समाज बांधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद कांबळे व आभार संतोष घोलप यांनी मानले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount