कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे : दयानंद गौडगांव
बसवेश्वर मित्र मंडळाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यंदाही पुणे येथील सिध्देश्वर मंगल कार्यालय गंगाधाम रोड येथे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना वेळ अमावस्यानिमित्त स्नेहभोजन कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.
पुण्यातील अक्कलकोटकरांनी घेतला वेळ अमावस्यानिमित्त स्नेह भोजनाचा आस्वाद
पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांनी आपल्या संपूर्ण परिवारासह येऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
गेल्या सहा वर्षापासून वेळ अमावस्याच्या दिवशी बसवेश्वर मित्र मंडळाच्यावतीने हा स्नेहभोजनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो. नोकरी, व्यवसाय आणि उदरनिर्वाहासाठी शेकडो अक्कलकोट तालुकावासी पुण्यात राहतात. आपली माणसं..म्हणजेच “तम्म तम्म मंदी”(कानडी भाषा) या भावनेतून अक्कलकोटवासियांना या दिवशी एकत्रित येण्याची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने बसवेश्वर मित्र मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे.