fbpx

भ्रष्टाचारमुक्त देश करण्यासाठी आरटीआयचा वापर करा – काटकर

बार्शीत सहजीवनच्या वतीने माहिती अधिकार कायदा कार्यशाळा संपन्न

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: भ्रष्टाचारमुक्त देश करण्यासाठी आरटीआयचा कायद्याचा वापर करण्याचे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांनी बार्शी येथे बोलताना केले. सहजीवन सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या माहिती अधिकार कायदा कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने बार्शी मध्ये आरटीआय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचारपीठावर संतोष बरबडे, अतुल अभंगराव, चेतन पवार, दीनानाथ काटकर आणि संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे, सचिव ॲड. सुहास कांबळे उपस्थित होते.

कार्यशाळेमध्ये प्रशिक्षणार्थींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या कायद्यामधील महत्वाची कलमे यावेळी समजावून सांगण्यात आली त्याचबरोबर अर्ज कसा भरावयाचा, अपिल कसे करावयाचे, काम करताना येणाऱ्या अडचणी देखील उदाहरणासह सांगितल्या.

उपळाई रोड येथील छत्रपती शंभूराजे सभागृहामध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी रामचंद्र गौरकर, शुभम नेवले आणि कोहिनुर सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन अविनाश डोईफोडे यांनी केले. आभार संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी किशोर कांबळे, दयानंद पिंगळे, सुमित नवले, संतोष कळमकर, सतीश नेटके, दत्तात्रय पाटील, उमेश नेवाळे, दत्ता दळवी, पंकज लंगोटे, अनिल काटकर, हुसेन मुलाणी, अमर पाटील, प्रमोद घोडके, अमर थोरबोले आदी सहजीवन परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *