कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताची पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
झाडबुके महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातून मिळालेला वारसा आपण सक्षम पणे पुढे चालला पाहिजे असे मत डॉ. नवनाथ दनाने यांनी मांडले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एम .डी. कांबळे, उपप्राचार्य सुर्वे, आयक्यू एससी कॉर्डिनेटर डॉ काशीद, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नैनवाड, डॉ. रमेश आजरी, डॉ. जे.पी. झाडबुके, खराडे व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापककेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी डॉ. रुपाली मोरे यांनी सावित्रीबाईचे कार्य व सध्याची स्थिती यावर आपले मत व्यक्त केले. वैशाली वाघमारे (निंबाळकर) व बागडे यांनी क्रांतीज्योती व क्रांतीसुर्य यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे समारोप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कांबळे एम.डी यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. कविता गायसमुद्रे तर आभार डॉ. नैनवाड केले.