fbpx

मळेगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ व सावता परिषद बार्शी यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मळेगाव येथे साजरी करण्यात आली.

सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी म्हणाले की, राजमाता जिजाऊ एक महान व्यक्तिमत्त्व व एक आदर्श आई ज्यांनी एक वीर पुत्राला जन्म दिला. जिजाऊ यांच्यामूळे स्वराज्यच तोरण बांधलं गेलं, त्या अगदी स्वतंत्र विचाराच्या होत्या त्यांना आपल्या देशाबद्दल आणि धर्मा बद्दल नेहमीच प्रेम वाटायच, म्हणूनच त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील त्यांनी लहानपणापासूनच देशप्रेम, धर्मप्रेम आणि एकनिष्ठचे धडे दिले. जिजाऊ माता यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शन आणी शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. मराठा साम्राज्य स्थापन करण्यामध्ये जिजाऊंचे फार मोठे योगदान होते. म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो.

जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन ग्रा.प.सदस्य सुजाता पाडुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठीसंजयकुमार माळी, उपसरपंच धीरज वाघ, माजी सरपंच गुणवंत मुंढे, मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पवार, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीराम निंबाळकर, उद्योजक समाधान पाडुळे, अविनाश मोरे, यशवंत गाडे, आरोग्य सेविका सविता पानढवळे, आरोग्य सेवक इस्माईल सय्यद, आशा वर्कर पूजा बोधले, रुपाली तट, आश्विनी नलावडे, अंगणवाडी सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *