कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर: येथील मनविक फाउंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून अनाथाश्रमच्या मुलांना अक्कलकोट येथे स्वामींच्या चरणी दर्शन व एक दिवसीय सहलीचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही संस्कार संजीवनी अनाथाश्रम मुळेगाव येथील लहान मुलांना फाउंडेशनच्या वतीने याचे आयोजन केले होते.
“मनविक” ने अनाथांना घडवले स्वामी दर्शन
सोलापूर मधील विविध अनाथाश्रमच्या मुलांना विविध सामाजिक संस्थेच्या व दातृत्वाच्या सहकार्याने प्रत्येक वर्षी सोलापूर जिल्ह्यातील व आजूबाजूला नळदुर्ग, रामलिंग, कुंथलगिरी अशा विविध ठिकाणी सहलीचे आयोजन करत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मोनिका जिंदे यांनी सांगितले.
शिक्षण, आरोग्य, सेवा, अन्नदान या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मनविक या संस्थेच्या माध्यमातून अशा विविध उपक्रमाचे नियोजन समाजातील विविध घटकातील लोकांच्या प्रगतीसाठी करणार असल्याचे संस्थेचे सचिव प्रा. विक्रमसिंह बायस यांनी सांगितले. आपल्या जिल्ह्यातील अक्कलकोट या तीर्थक्षेत्र ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व सेवा याचसोबत अक्कलकोट येथील महाराजांचे पॅलेस अशा विविध ठिकाणी अनाथ मुलांनी भेटी दिल्या. या एकदिवसीय सहलीसाठी राजेश वडीशेरला, अतिष पवार, अंकुश चौगुले, परमेश्वर काळे, सुरेखा बायस, चेतन जिंदे, उज्वला जिंदे, अक्षय जिंदे, अनिकेत सरवदे यांनी परिश्रम घेतले. तर या सहलीच्या नियोजनसाठी स्वप्नील काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.