fbpx

बार्शीत भटक्या कुत्र्यांनी तोडले बालकाचे लचके

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : येथील शिवाजी नगर या भागात निपाणीकरवाडा येथे राहणारा सहा वर्षाचा बालक शिवसाई समाधान तांबिले मूळ गाव, नांदणी , ता बार्शी हा सायंकाळी पाच वाजनेचे सुमारास आपल्या घरा बाहेर खेळण्यासाठी गेला असता अचानक या परिसरात वावरणारी पाच भटकी कुत्री तेथे आली त्या बालकावर तुटून पडली. यात या सहा वर्षाच्या चिमुरड्याचे अक्षरशहा लचके तोडले. त्याच्या हात, पाय आणि इतर शरीरावर या कुत्र्याचे दात बुडाले असून तो यात गंभीर जखमी झाला आहे. या वेळी याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेने या बालकास या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून सोडवले असून तो आता बार्शीत जगदाळे मामा हॅास्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
मात्र या बालकाचे वडील यांची आर्थिक परिस्थती बेताची असून शिवसाई च्या उपचारा साठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यावेळी बार्शी नगर अध्यक्ष असिफ तांबोळी यांनी या मुलाच्या उपचारासाठी दावाखान्याशी बोलून मार्ग काढला जाईल असे सांगितले. तर बार्शी शहरात अस्या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना हि दिल्या आहेत. आता या लॉकडाऊन च्या काळात बार्शी शहरातील सर्व हॉटेल , चायनीज गाडे व इतर सर्व काही बंद असल्याने या भटक्या कुत्र्यास खायला मिळत नाही. त्यामुळे आता ही कुत्री लहान बालकावर तुटून पडत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी अशी भटकी कुत्र्या पासून आपल्या लहान मुलांचे आणि आपलेही रक्षण करणे गरजेचे आहे. तर तशी भटकी कुत्री समुहाने फिरत असल्यास बार्शी नगर पालिकेस तात्काळ कळवणे गरजेचे आहे.

कुत्र्यांची नस बंदी होऊनही संख्या वाढते कशी

काही वर्ष पूर्वी कुत्री यांना जीवत मारण्यास बंदी चा कायदा झालेला आहे. त्यामुळे अश्या भटक्या कुत्र्यांची पैदास होऊ नये म्हणून शासनाने त्यांची नस बंदी करण्याची योजना आखली होती. बार्शीत हि नगर परिषदेला असा निधी त्या वेळी आला. त्यासाठी टेंडर मागवून कुत्र्यांची नसबंदी चा कार्यक्रम राबवला होता. मात्र तो फक्त कागदावरच राबवला गेला. आणि क्यत्र्यांची नसबंदी हि फक्त कागदावरच झाली. त्यामुळे बार्शी नगर परिषदेने अश्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *