fbpx

बार्शीत उडान फाउंडेशनतर्फे प्रजासत्ताकदिनी रक्तदान शिबिर

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: येथील उडान फाउंडेशन या सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित रक्तदान शिबिराचे आयोजन केले. विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग गरीब, गरजु रुग्णांच्या उपचारासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. या शिबिरात १८५ जणांनी रक्तदान केले.

या शिबिराचे रक्तसंकलन मल्लिकार्जुन ब्लड सेंटर सोलापूर यांनी केले. तसेच या शिबिरास महिला व दिव्यांग व्यक्तिनेही सहभाग नोंदविला. यावेळी शिबिरास आमदार राजेंद्र राऊत, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, बार्शी बार असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव, नगरसेवक महेश जगताप, कयूम पटेल, लायन्स क्लब अध्यक्ष ॲड.विकास जाधव, वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, गणेश नान्नजकर, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय पाटील, किरण कोकाटे आदिंनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी माजी नगरसेवक शमशोद्दीन केमकर यांनीही रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी उड़ान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, जफर शेख, बार्शी नगर परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद, इंनुस शेख, अय्यूब शेख, कार्याध्यक्ष शकील मुलानी सचिव जमील खान, खजिंनदार शोयब काझी, नगरपरिषदेचे माजी अभियंता समशेर पठाण, मोईन नाईकवाडी, तौसीफ बागवान, जिलानी शेख, साजन शेख, मोहसीन पठाण, हाजी राजू शिकलकर, रॉनी सैय्यद, मुन्ना बागवान, समीर शेख, सलीम चौधरी, इरफान बागवान, रियाज़ शेख, अल्ताफ़ शेख, जमीर तंबोली, रियाज बागवान, मोहसीन दिल्लीवाले, अकील मुजावर यांनी अथक परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *