कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे बेकायदा रमी जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी! मळेगाव बेकायदा जुगार खेळणाऱ्या सात जणांवर पांगरी पोलिसांची कारवाई
यासंबंधी सविस्तर वृत्त, तालुक्यातील मळेगाव ता.बार्शी या गावातील नाना सुतार रा.मळेगाव यांचे शेतालगत असणाऱ्या चिंचेच्या झाडाखाली कांही लोक रमी नावाचा जुगार खेळत होते. पोलीसांनी सदर इसमांना गराडा घालुन जागीच पकडले असता ते सर्व लोक रमी नावाचा जुगार पैशावर खेळताना मिळुन आले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह पाच हजार रुपयाची रोख रक्कम जप्त केली आहे. यावरून १) दिलावर शाहु शेख (वय ५५) 2)अकुश रामचंद्र माळी (वय ५८) ३) रमेश चंद्रशेन नलवडे (वय ४४) वर्षे ४)शिवाजी विठोबा वाघ (वय ४४) ५)संतोष शिवाजी इंगोले (वय ४०) ६)बाळु गोपाळ शिंदे (वय ४३) ७)हणुमंत नागनाथ राउत (वय ४६ ) सर्व रा.मळेगाव ता.बार्शी जि.सोलापुर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.