fbpx

रेशनच्या १७ पोती धान्याचा अपहार ; चालक व ठेकेदारावर गुन्हा दाखल

कुतूहल न्यूज नेटवर्क

माढा : माढा तालुक्यातील कुर्डू येथे शासनाच्या रेशन दुकानच्या अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील १७ पोती गव्हाचा अपहार केल्याप्रकरणी ट्रक चालक व ठेकेदार या दोघाविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना गुरुवार ७ मे रोजी रात्री ११ . ३० वाजण्याच्या सुमारास कुर्डू- बारलोणी रोडवरील एका शेतातील गोडाऊन जवळ घडली.

ट्रक चालक जावेद पठाण व ठेकेदार रमेश शहा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत माढा तहसीलचे प्रभारी पुरवठा निरीक्षक शबाना कोरबू यांनी फिर्याद दिली आहे.
कुर्डुवाडी येथील शासकीय गोदामातुन एम . एच . १२ एफ . झेड . ४९३७ या मालट्रक मधुन ४९१ पोती गहू जेऊर ता करमाळा येथे जाणार होता.

जिल्हा पुरवठा कार्यालयाचे वाहतूक प्रतिनिधी निवृत्ती लांडगे रा . बार्शी हे कुर्डूवाडी येथून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे माढा व करमाळा तालुक्यात रेशनचे गहू व तांदूळ हे धान्य वितरीत करतात. याचे टेंडर मुंबईचे क्रिएटिव्ह कन्झुमर्स को – ऑप . सोसायटी लि . चे प्रोप्रायटर रमेश शहा रा.मुंबई,यांच्याकडे असुन शहा हे शहरातील वेगवेगळ्या लोकांकडून ट्रक भाड्याने घेऊन शासकीय मालाची वाहतूक करतात. गुरुवारी ७ मे रोजी सायंकाळी ६ वा . कुर्डूवाडी गोडाऊन मधुन ४९१ पोती गहू ( वजन २४० क्विंटल ) ट्रक चालक जावेद इमाम पठाण रा . कुर्डूवाडी याच्या ताब्यात देऊन शासकीय गोडावून जेऊर ता करमाळा येथे पोहोच करण्यासाठी सांगितले . दि ८ रोजी सकाळी ६ सुमारास माढ्याचे तहसिलदार राजेश चव्हाण यांना कुर्डू – बारलोणी रोडवर हा ट्रक संशयास्पद स्थितीत उभा असल्याची . सदर ठिकाणी पुरवठा अधिकारी शबाना कोरबू व मंडलाधिकारी विजयकुमार जाधव , तलाठी अंकुश मेहर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता ट्रकमध्ये ४७४ पोती आढळून आले. यामधील १७ पोती ( ८ क्विंटल ) गहू कमी असल्याचे निदर्शनास आल्याने सदरचा ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला.१७ पोती गव्हाचा अपहार केल्याप्रकरणी ट्रक चालक पठाण व ठेकेदार शहा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *