fbpx

मळेगांवात ई पीक पहाणी कार्यशाळा

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: मळेगांव ता. बार्शी येथे ई पीक पहाणी संदर्भात तलाठी गणेश राजे व पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी यांनी कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या वतीने ई पीक पहाणी प्रकल्प राबविला जात आहे. त्या अनुषंगाने बार्शी तालुक्याचे तहसीलदार यांनी संबंधीत अधिकारी यांना लवकरात लवकर शेतकऱ्यां कडून ई पीक पहाणी करून घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत त्यामुळे तलाठी यांनी मळेगावातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पहाणी पूर्ण करावी अशी विनंती केली. (E-Crop Inspection Workshop at Malegaon)

याकार्यशाळेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत दीक्षित, शिक्षक विठ्ठल कोकरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी, महा ई सेवा केंद्राचे लक्ष्मण सुरवसे, रोजगार सेवक दादा आपुणे ,ग्रामपंचायत लिपिक सुरेश कांबळे, बजरंग गाडे, कुंडलिक माळी आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *