fbpx

पांगरी येथे बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने यावेळेत राहतील सुरू

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी : मा.जिल्हाधिकारी,सोलापूर यांच्या आदेशानुसार चालू लॉकडाऊन मध्ये बिगर अत्यावश्यक सेवेची दुकानांना सुट देण्यात आली आहे. ( पोलिस आयुक्तालय हद्द वगळून व प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्र (containment Zone) वगळून )

त्यानुसार मौजे पांगरी ता. बार्शी गावासाठी ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समितीने खालील प्रमाणे निर्णय घेतले आहेत.

  1. अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने/आस्थापना यामध्ये किराणा कृषीविषयक बाबी दूधसेवा सकाळी 7 ते संध्या 7 पर्यंत चालू राहतील.
  2. अत्यावश्यक सेवा मेडिकल दवाखाने ई, आरोग्य विषयक बाबी 24 तास चालू राहतील.
  3. बिगर अत्यावश्यक सेवा यामध्ये कपडे,स्टेशनरी,चप्पल दुकान,मोबाइल,फोटोग्राफी,स्वीटमार्ट,सोने,भांडी,हार्डवेअर,
    लाँड्री ,पंक्चर दुकान,गॅरेज दुकान ई, दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे पर्यंत चालू राहतील,
  4. यामध्ये सलुन, हाँटेल, रेस्टॉरंट,ढाबे तंबाखूपदार्थ विक्री करणारे पान टपरी दुकाने,चहाची दुकाने,बार ई. दुकाने पूर्णता बंद राहतील.
  5. चिकन,मासे,मटनाची दुकाने सकाळी 8 ते संध्या 6 पर्यंत चालू राहतील.
  6. गावातील मेडिकल, दवाखाने ई, आरोग्य बाबींची अस्थापणे वगळून सर्व दुकाने दर शनिवारी बंद राहतील.
  7. Social distancing चा काटेकोर पालन करणे तसेच मास्क चा किंवा रूमालाचा वापर करून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी सर्व दुकानदार,अस्थापणाची राहील.
  8. वरील सर्व बाबी बाबत गावातील सर्व नागरिकांनी शासन निर्देशनुसार व वैद्यकीय सूचना प्रमाणे तोंडाला मास्क अथवा रुमाल वापरणे बंधनकारक आहे,तसेच प्रत्येक व्यक्तिनि social distancing राखावे .वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आले असून यांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *