कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील मळेगावात ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नवीन बनवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वाँल कंपाऊंडचा लोकार्पण सोहळा संजयकुमार माळी व उद्योजक बापू थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. (Dedication ceremony of Wall Compound held at Malegaon)
मळेगावात वाॅल कंपाऊंडचा लोकार्पण सोहळा संपन्न
या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष अंकुश माळी, उपसरपंच धीरज वाघ, यशोदीप सामाजिक शिक्षण सस्थेचे संस्थापक रशीद कोतवाल, मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पवार, सावता परिषद तालुका युवक अध्यक्ष अशोक माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीराम निंबाळकर, पंचायत समितीचे अविनाश मोरे, मंडळाचे मार्गदर्शक दीपक निंबाळकर, अविनाश मोरे बाळासाहेब नलावडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.