कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: युवराज काटे यांना स्व. जयवंत दादा काटमोरे प्रतिष्ठानचा राजकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते पिंपरी (पा) ता. बार्शी येथे प्रदान करण्यात आला.
युवराज काटे यांना स्व. जयवंत दादा काटमोरे प्रतिष्ठानचा गौरव पुरस्कार प्रदान
बार्शी तालुक्यातील खामगांव हे काटे यांचे गाव असून प्राथमिक शिक्षण याच गावात घेवून पदवी त्यांनी बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केली. वयाच्या १५ व्या वर्षी शिवप्रेमी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना करून गावातील तरुणांना एकत्र करून सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादन करून सामाजिक कार्याबरोबरच राजकारणात प्रवेश केला. वयाच्या २६ व्या वर्षी बार्शी पंचायत समितीची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकून सभापती पद भूषविले.
समाजकार्य, राजकारण, शिक्षण याचबरोबर वडिलांच्या प्रेरणेने कुस्ती क्षेत्रात ही कमी वयात अनेक दिग्गज मल्लांना अस्मान दाखवून आपला दबदबा निर्माण केला. या क्षेत्रात राहून तालुक्यातील तरुण व ज्येष्ठ लोकांच्या मनात प्रेम आपुलकीचे स्थान निर्माण केले. समाजकार्याच्या माध्यमातून आपले कर्तृत्व आणि कला गुणांच्या सहाय्याने बार्शी तालुका व परिसरातील राजकारणामध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणारं एक शांत संयमी व समाजशील व्यक्तिमत्व अशी युवराज काटे यांची ओळख निर्माण झाली आहे.