कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धेमध्ये कर्मचारी गटातून तालुका समन्वयक रागिनी दिलीप मोरे-वासकर यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकवला आहे.
बार्शीची रागिणी मोरे राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धेत राज्यात प्रथम; ग्रामविकास मंत्र्यांचे हस्ते सन्मान
जागतिक महिला दिनानिमत्त ८ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय मुंबई येथे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार पारितोषिक, सन्मानपत्र, २१ हजाराचा धनादेश व महिला बचत गटांनी तयार केलेली पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातील परमेश्वर राऊत, अतिरिक्त संचालक रामदास धुमाळे, स्नेहल विचारे व उमेद अभियानातील कर्मचारी आणि राज्यभरातून महिला उपस्थित होत्या.