fbpx

अश्वमेध यात्रा ही जनतेशी संवाद साधण्यासाठी : जिल्हाध्यक्षा ॲड. सुप्रिया गुंड-पाटील

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील चारे या ठिकाणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ॲड. सुप्रिया गुंड-पाटील यांच्या संकल्पनेतून अश्वमेध यात्रेचा शुभारंभ झाला. अश्वमेध यात्रा ही जनतेशी संवाद साधण्यासाठी असून यात्रेत जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे तसेच गाव तिथे राष्ट्रवादी घर तिथे झेंडा असा उपक्रम राबवून येत्या काळात राष्ट्रवादी तळागाळातील लोकांपर्यंत रुजवण्याचा मानस असल्याचे गुंड-पाटील यांनी सांगितले. (Commencement of Ashwamedh Yatra on behalf of Nationalist Women’s Congress)

अश्वमेध यात्रेत जनतेने त्यांचे प्रश्न, समस्या आमच्या समोर मांडाव्यात तसेच महिलांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून जनतेसाठी काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा उपाध्यक्षा शामल काशिद यांनी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. तसेच त्यांनी कोरोना योध्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
दरम्यान, तालुकाध्यक्षा ॲड. दैवशाला जाधवर व शामल काशिद यांनी चारे व वालवड या ठिकाणी महिला शाखेचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन जिल्हाध्यक्षा ॲड. सुप्रिया गुंडपाटील व राष्ट्रवादीचे निरंजन भुमकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बार्शी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, वैराग शहराध्यक्ष प्रशांत भालशंकर, सैफन शेख, रेश्मा राऊत, रेखा तुपे, रेखा ननवरे, शितल मांजरे, साखरबाई चौधरी महिला व पुरुष पदाधिकारी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *