fbpx

बागवान सोशल फाउंडेशनचा वर्धापनदिन गरजूंना साड्या वाटप करून साजरा

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी येथील बागवान सोशल फाउंडेशनचा दुसरा वर्धापनदिन गरजू महिलांना साड्या वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, कॉंग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष वसिम पठाण, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा ॲड. सुप्रिया गुंड-पाटील, बार्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष अजित कुंकुलोळ, डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, बागवान सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेर बागवान, बागवान समाज अध्यक्ष लियाकत भूमकर, सचिव कदीर बागवान यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला.

दरम्यान, बार्शी शहर व तालुक्यातील पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जुबेर येडशीकर, अन्वर बागवान, साहिल बागवान, विशाल अग्रवाल, अकबर बागवान, अमीर बागवान, इमाम लांडगे, संगीता पवार, सुनंदा चव्हाण, पत्रकार गणेश गोडसे, धीरज शेळके, दिनेश मेठकरी, सचिन ठोंबरे, गणेश घोलप, इरशाद शेख, विक्रांत पवार यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी तर आभार बादशाह बागवान यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *