कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: माढा तालुक्यातील बेंबळे येथील रहिवासी रुपाली हनुमंत निर्धार- गोरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झाल्याबद्दल पांगरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा लाडे, सहा. पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, डॉ. अरुण नारकर, डॉ. आरिफ शेख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुहास देशमुख, प्रा. विलास जगदाळे, शहाजी धस, ग्रा.पं.स. सतीश जाधव, स्वस्तिकी काकडे आदींनी रुपाली यांना शुभेच्छा दिल्या.
रुपाली निर्धार यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पांगरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
दरम्यान, रुपाली निर्धार यांचा सन्मान जिल्हा परिषद शाळा मुले-मुली, उर्दू , देशमुख परिवार, मोरे मेजर सिक्युरिटी, बेलखोरी बचत गटाकडून करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच धनंजय खवले, ग्रामविकास अधिकारी सिद्धेश्वर चौधरी, डॉ. विलास लाडे, बाळासाहेब मोरे, मुख्याध्यापिका सुनिता पाटील-मुळे, ग्रा.पं.स रेणुका मोरे, ग्रा.पं.स मनीषा धस, विश्वास देशमुख, विक्रम देशमुख, रामभाऊ देशमुख, चंद्रकांत गोडसे, गणेश गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन इरशाद शेख यांनी तर आभार डॉ. आरिफ शेख यांनी मानले.
रुपाली निर्धार-गोरे यांची माहिती
रुपाली निर्धार-गोरे ह्या बेंबळे येथील शेतकऱ्याच्या घरात जन्मल्या. रुपाली बेंबळेतील विमलेश्वर विद्यालयातून २००२ साली दहावीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्या व टेंभुर्णी येथील कन्या प्रशाला मधून कला विभागातून बारावी परीक्षा उच्च श्रेणीत उतीर्ण झाल्या. बारावीनंतर त्यांचा विवाह बार्शी तालुक्यातील धानोरे येथील सोमनाथ अर्जुन गोरे यांच्याशी विवाह संपन्न झाला. सोमनाथ गोरे हे भारतीय लष्करात नोकरी करत होते. त्यामुळे पतीसोबत रुपाली यांना महाराष्ट्राबाहेर राहावे लागेल. परंतु, या काळात देखील त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. त्यांनी घरी अभ्यास करून मुंबई मुक्त विद्यापीठातून बी.ए पदवी प्राप्त केली. व पुणे मुक्त विद्यापीठातून एम.ए ही व्दिपदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरु केला. २०१९ च्या बॅच मध्ये पोलीस पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. (Rupali Nirdhar felicitated on behalf of Pangri villagers for being selected as Sub-Inspector of Police)