fbpx

खड्ड्यात झाडे लावून केले ग्रामस्थांनी आंदोलन…

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी-आगळगाव रस्ता अत्यंत खराब झाला असून आगळगाव हद्दीत असलेल्या ओढयावरील पुलाला मोठे भगदाड पडले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार लेखी, तोंडी तक्रार देवून ही बांधकाम विभागाने कोणतीही यावर उपाययोजना न केल्याने आगळगाव येथील संतप्त वाहनचालकांनी ओढयावरील पुलावर गांधीगिरी मार्गाने पुलावरील खड्डयात झाडे लावून अनोखे आंदोलन केले. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला मोठी भगदाड पडली असून वाहतूकीसाठी ६ ते ७ फूट रस्ता वापरात येत असून वाहन या ठिकाणी वाहन चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरस करावी लागत आहे.

आगळगाव हे आठवडी बाजाराचे गाव असून या गावामध्ये आयडीबीआय बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोष्ट ऑफिस, पशुवैद्यकिय दवाखाना, डीसीसी बॅंक, तसेच लोकसेवा विद्यालय आगळगाव, दिलीपराव सोपल आश्रम शाळा या रस्त्यावर असल्याने या रस्त्यावर कायम वाहतूक असते. शाळेतील विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून सायकल चालवताना जिव मुठीत धरून चालवावी लागते.

या पुलावर अपघात झाल्यास त्या अपघाताची संपूर्ण जबाबदारी संबधित विभागाची राहिल असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट डमरे यांनी दिला.

संबधित विभागाने लक्ष देवून रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास तिव्र आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बबन गायकवाड यांनी दिला.

यावेळी माजी सरपंच सुरज आगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट डमरे, माजी सैनिक सुभाष गडगडे, ग्रामपंचायत सदस्य बबन गायकवाड, अमोल विधाते, बालाजी जाधव, कमलेश गोरे, तानाजी उकिरडे, शिवलिंग जमदाडे, दादा डमरे, महेंद्र गरड, दादा डमरे, नितीन खटके सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(The villagers started agitation by planting trees in the pit)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *