fbpx

मळेगांव विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी अशोक माळी

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: मळेगांव ता. बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी यांची मळेगांव विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्रजी हजारे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, शिवसेना नेते बाळासाहेब दंडनाईक, मोहोळचे उद्योजक जयसिंग भानवसे, सावता परिषदेचे बार्शी तालुका अध्यक्ष दिनेश नाळे, सहारा वृद्धआश्रम गौडगांवचे संस्थापक राहुल भड, उद्योजक राजाभाऊ काळे, सरपंच परिषदेचे शिवशंकर ढवण, पांडुरंग घोलप आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

मळेगांव येथील ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थ करून पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असे कुतूहल शी बोलताना नूतन संचालक अशोक माळी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *