कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील बावी (आ) येथे सम्यक बोधीवन ट्रस्ट आणि दि पिपल्स वेलफेअर चैरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने एकदिवसीय धम्म तथा कार्यकर्ता कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यकमाचे अध्यक्षस्थानी फुले, शाहू आंबेडकर संस्थंचे अध्यक्ष अनिल खुने हे होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून राजाभाऊ कदम, कार्यक्रमास प्रमुख भंते अधिचितो कर्जत रायगड येथील भंते लाभले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीची नवी दिशा या विषयी मार्गदर्शन राजाभाऊ कदम व त्यांच्या टीम नी यांनी केले.
बावी (आ) येथे एक दिवशीय धम्म व कार्यकर्ता कार्यशाळा
यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यात म्हणतात मला या देशात धम्म चळवळीतून डॉक्टर, वकील, बॅरिस्टर आणि देशाचा पंतप्रधान बनावयाची अशी तरतूद करायची आहे. या विचारावर कदम यांनी उपस्थित बौद्ध उपासक व बौध्द उपासिका यांना मार्गदर्शन केले. यावेळी दशरथ गायकवाड, वसंत कदम, चंद्रकांत कदम, प्रवीण अरन यांनी यावेळी सहकार्य केले. राजू गायकवाड, रमेश गवळी, सुजित लंकेश्वर, सुमित खुरंगुळे, विश्वनाथ सोनवणे, बाळासाहेब ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.