गुळपोळीत महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरीबार्शी तालुक्यातील
गुळपोळीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
बार्शी: गुळपोळी ता बार्शी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुमित माळी होते. प्रमुख उपस्थिती किरण खुरंगळे होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुमित माळी व किरण खुरंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी मान्यवरांचे गुलाब देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केली. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, किरण खुरंगळे, सुमित माळी, अमित काळे, रंजना खुरंगळे, दिपाली चौधरी, सुभद्रा चौधरी आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना आभार भैरवनाथ चौधरी तर सूत्रसंचालन दिपाली चौधरी यांनी केले.
(celebrated Mahatma Jyotiba Phule Jayanti in Gulpoli)