कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ३१ मुर्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भ. वि. जा. जमाती राज्य समन्वयक बालाजी शिंगे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद रोकडे, अक्षय बनसोडे हे कार्यक्रमास लाभले.
गौडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ३१ मुर्तीचे वाटप
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमाचे वाटप करत आहोत पण आज पासून बाबासाहेबांचे विचार फक्त बौद्ध समाजापुरते मर्यादित न ठेवता त्यांचे विचार आणि जयंती देखील इतर समाजात केली पाहिजे असे बालाजी शिंगे यांनी आपल्या भाषणात भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य गायकवाड, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, तालुका अध्यक्ष समाधान भालशंकर, धनजंय जगदाळे, भेय्यासाहेब नागटिळक, अरविद गोरे, विलास , लालासाहेब वडवे सोनाजी काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गोरे यांनी केले.
(Distribution of 31 idols on the occasion of Babasaheb Ambedkar’s birth anniversary)