fbpx

कसपटे नाना आणि आम्ही शेतकरी हितासाठीच कार्यरत – राजू शेट्टी

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: आम्ही उत्पादित झालेल्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून काम करताे तर नवनाथ उर्फ नाना कसपटे यांनी उत्पादित होणारा माल हा दर्जेदार असावा, तो कमी खर्चात तयार व्हावा, जास्त उत्पादन मिळावे यासाठी ते काम करतात. सिताफळासारख्या दुर्लक्षित वाणातील प्रजातींचे शोध घेण्यासठी आपले आयुष्य वाहून घेतले आहे, म्हणून आमचे दोघांचेही काम हे शेतकरीहिताचे असल्याने एकच प्रकारचे आहे. त्यांच्या कोणत्याही अडचणीच्या कामासाठी मी नेहमीच त्यांच्या बरोबर राहिल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

बार्शीतील प्रगतीशील शेतकरी व सिताफाचे संशोधक डाॅ. नवनाथ कसपटे यांच्या मधुबन फार्म नर्सरी येथे सदिच्छा भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, बळीराजा हुंकार यात्रा काढण्याचा हेतू मुळात हाच आहे, की आजच्या स्थितीत बळीराजाच्या मनात अशा प्रकारचे प्रश्न व समस्यांचा जो आक्रोश आहे. त्यांना वाट करुन देणे व यावरुनही राज्यकर्ते जर सुधारले नाहीत तर त्यांचा स्फोटात रुपांतर घडवून आणणे यासाठी १६ एप्रिलपासून या यात्रेची सुरुवात केली आहे. आता आमची लढाई सुरु आहे ती शेतकऱ्यांना दिवसा व किमान दहा तास वीज मिळाली पाहिजे त्यासाठी आहे. वीज ही नैसर्गिक साधनसंपत्तीपासून तयार होते. सूर्यप्रकाश, वारा, पाणी, भूगर्भातील दगडी काेळसा, नैसर्गिक गॅस, युरेनियम या सर्व साधनसंपत्तीवर घटनेनुसार नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.

यावेळी शिवाजी पाटील, लक्ष्मण पाटील, परबत, सत्यवान गायकवाड, नवनाथ कसपटे, प्रविण कसपटे, माणिक हजारे, ॲड. विक्रम सावळे आदी उपस्थित होते.

(Kaspate Nana and we are working for the benefit of farmers – Raju Shetty)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *