कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: येथील स्व. शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूलमध्ये आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांसाठी व महिला पालकांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. महिला पालकसाठी संगीतखुर्ची स्पर्धा व माझी आई सुगरण हा कार्यक्रम घेण्यात आला.
पांगरीतील सोपल सेमी इंग्लिश स्कूलमध्ये विविध उपक्रमाचे सादरीकरण

या स्पर्धेमध्ये महिला पालकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद लुटला. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार धीरज शेळके, पत्रकार इरशाद शेख, चांगुनाबाई कुसळे, शाळेचे संस्थापक विनायक गरड, मुख्याध्यापिका अश्विनी घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अरविंद पाटील, सविता चांदणे, उल्का जगदाळे, मनीषा अबदारे, ऋतुजा चव्हाण, ज्योती ननवरे, अकबर काझी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा लोंढे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विनायक गरड यांनी मानले.
(Presentation of various activities at Sopal Semi English School in Pangri)