कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पांढरी (ता. बार्शी) येथील एका युवकाने आज्जीच्या व वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ हॉस्पिटलसह शाळेला ६३ हजार रुपयांची आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सोलापूरातील युवकाने आज्जीच्या व वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ हॉस्पिटलला केली आर्थिक मदत
गणेश मोहन घावटे या युवकाचे वडील मोहन (बापू) भिमराव घावटे यांचे गेल्यावर्षी कोरोनामुळे निधन झाले. मोहन घावटे यांच्या निधनाच्या धक्क्याने त्यांची आई विठाबाई भिमराव घावटे यांचेही निधन झाले.
बापूंनी स्वतःच्या कष्टावर शून्यातून विश्व निर्माण केले आहे. तसेच त्यांची समाजाप्रती नेहमीच दायित्वाची भूमिका राहिलेली आहे. याचा वारसा पुढे नेत आम्ही शासनामार्फत प्राप्त सर्वमदत बार्शीतील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांनी उभा केलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटल येथील ट्रामा सेंटरसाठी ५१ हजार ५०० रुपये व महाराष्ट्र विद्यालय येथे पिण्याच्या पाण्याकरिता ११ हजार ५०० रुपये असे एकूण ६३ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. प्रा. गणेश घावटे, ता.बार्शी
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, महाराष्ट्र विद्यालय प्राचार्य चव्हाण, उपप्राचार्य काळे यांचे उपस्थित घावटे कुटुंबीयांनी धनादेश सुपूर्द केले. यावेळी मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी शरद घावटे, प्रा. गणेश घावटे, प्रा. तात्या घावटे, राजेंद्र घावटे, सुरेश धावणे उपस्थित होते.
(A young man from Solapur donated money to the hospital for his father’s first remembrance)