कुतूहल न्यूज नेटवर्क
अंध्यत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत नेत्रतपासणी पुनश्च सुरू करा- विष्णू पवार
पांगरी :अंध्यत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत नेत्रतपासणी पुनश्च सुरू करा अशी विनंती ग्राहक समिती बार्शी तालुकाध्यक्ष विष्णू पवार यांनी ग्रामीण रुग्णालय पांगरीचे वैद्यकीय अधीक्षक रविंद्र माळी यांच्या कडे केली आहे.
22 मार्च पासून ग्रामीण रुग्णालय पांगरी येथील अंध्यत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत नेत्र तपासणी बंद आहे.सोलापूर जिल्हा रेड झोन मध्ये येत असले तरी बार्शी तालुक्यात सुदैवाने किरोना विषाणूचा शिरकाव झालेला नाही.त्यामुळे मोफत नेत्रतपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया लाभार्थीची नोंदणी व चष्माच्या नंबर काढणे ही कामे लोकहितार्थ निर्णय घेऊन परत पूर्वरत योग्य ती काळजी घेऊन सुरू करण्यात यावेत,अशी विनंती केली आहे.