कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूरात आज सकाळी वाढले तब्बल 42 रुग्ण ; एकूण 709
सोलापूर : आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 42 पॉझिटिव्ह अहवाल मिळाले आहेत आज एकूण 129 तपासणी अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी 87 निगेटिव्ह अहवाल मिळाले आहेत.
42 बाधित रूग्णांमध्ये 17 पुरुष असून 25 महिला आहेत तर आज एका पुरूषाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सोलापुरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 709 इतकी झाली आहे.
आजपर्यंत एकूण मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 67 झाली आहे. बरे होऊन गेलेले 311 जण आहेत.
सोलापूर आजचा अहवाल
दि.28/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 129
पॉझिटिव्ह- 42 (पु. 17 * स्त्रि- 25 )
निगेटिव्ह- 87
आजची मृत संख्या- 1 पु
एकुण पॉझिटिव्ह- 709
एकुण निगेटिव्ह – 5580
एकुण चाचणी- 6289
एकुण मृत्यू- 67
एकुण बरे रूग्ण- 311