कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापुरातील आज 8 जणांचा मृत्यू ; वाढले 14 बाधित ,एकूण संख्या 865
सोलापूर : जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार आज शनिवारी सायंकाळी 14 बाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये पाच पुरुष तर तीन महिलांचा समावेश होतो.
- एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 7707
- प्राप्त तपासणी अहवाल 7036
- प्रलंबित तपासणी अहवाल 671
- निगेटिव्ह अहवाल 6171
- पॉझिटिव्ह अहवाल 865
आज आढळलेले रुग्ण…
- उत्तर कसबा परिसर- दोन पुरुष
- मरीआई चौक, दमानी नगर 1 महिला
- सरवदे नगर – एक पुरुष
- गांधीनगर ,अक्कलकोट रोड -एक पुरुष
- बुधवार पेठ – एक महिला
- जुना विडी घरकुल -दोन पुरुष, एक स्त्री
- आंध्र तालीम लष्कर -एक पुरुष
- मोदी परिसर -एक महिला
- कुमठा नाका- एक महिला ,
- अंबिका नगर ,जुना विडी घरकुल -एक पुरुष
- नीलम नगर- एक पुरुष
आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 865 इतकी झाली आहे यामध्ये पुरुष 495 तर महिला 370 आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आज पर्यंत एकूण 83 जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये 51 पुरुष असून महिलांची संख्या 32 इतकी आहे.
आज आठ जणांचा मृत्यू झाला आहे .
सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर याठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन पुरुष असून दोन महिला आहेत, तर अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय ,कुंभारी येथे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये एक पुरुष व एक महिला आहे. तर श्री मार्कंडेय सोलापुर सहकारी रुग्णालय येथे एका पुरूषाचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये अक्कलकोट रोड परिसरातील,गांधीनगर भागातील 45 वर्षाचे पुरुष, त्यानंतर 61 वर्षाची महिला ज्या नरसिंह नगर मोदी परिसरात राहत होत्या.
तिसरी व्यक्ती भवानी पेठ परिसरातील 72 वर्षाचे पुरुष आहेत.अवंती नगर परिसरातील 69 वर्षाची महिला,
जुना विडी घरकुल परिसरातील 67 वर्षाचे पुरुष ,बाळीवेस परिसरातील 62 वर्षाची महिला ,उत्तर कसबा परिसरातील 61 वर्षाचे पुरुष आणि वेणुगोपाल नगर परिसरातील 41 वर्षाचे पुरुष मृत्यू पावल्याची माहिती देण्यात आली आहे
उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 402 इतकी आहे. यामध्ये पुरुष 234 असून महिला 168 आहेत .दिलासादायक बाब म्हणजे आजतागायत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 380 इतकी लक्षणीय चांगली आहे यामध्ये 210 पुरुष असून 170 महिलांचा समावेश होतो