कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार ; आठ-आठ दिवस येत नाही नळाला पाणी
पांगरी : पांगरी ता. बार्शी येथे काही भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही तर काही ठराविक भागात सुरळीत पाणी सोडले जात आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाजन गल्ली व बागवान गल्ली येथे दर चार ते पाच दिवसांनी नळाला पाणी सोडले जाते पण गेल्या काही महिन्यात किमान महिन्यातून 1 ते 2 वेळेस 6-8 दिवसांनी पाणी सोडले जात आहे .ग्रामपंचायत मध्ये विचारणा केली असता पाईपलाईन फुटली आहे किंवा मोटार ना दुरुस्त आहे हेच उत्तर दिले जात आहे.ह्याच भागातील सारखे पाईपलाईन व मोटार ना दुरुस्त होते कसे असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे .सध्या कोरोनाचे संकट असताना पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावे लागते आहे.
“सदर भागात पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटली आहे ,आम्ही साहित्य आणले असून लवकर पाणी सोडण्यात येइल -सरपंच इन्नुस बागवान”