fbpx

बार्शी येथे झाडांचा वाढदिवस केला साजरा

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शीच्या २ लिंब परिसरातील लिंबाच्या व वडाच्या झाडाचा वाढदिवस करून वृक्ष संवर्धन बार्शीचा वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडाचे झाड तर प्रमुख पाहुणे म्हणुन लिंबाचे झाड यांची निवड करण्यात आली.

वृक्ष संवर्धन समिती बार्शीच्या कार्याला वृक्षप्रेमी अभिनेते सायाजी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली आज एक वर्ष पुर्ण झाले त्याचे व जागतिक पर्यावरन दिनाचे औचित्य साधुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात मागील वर्षी ५ जून २०१९ रोजी सर्व वृक्ष प्रेमींनी एकत्र येऊन वृक्ष संवर्धन समिती बार्शीची स्थापना केली व याची सुरुवात उपळाई रोड ची जुनी ओळख असलेल्या दोन लिंब याठिकाणी दोन लिंबाची झाडे लावुन केली होती. या चळवळीत बार्शीसह ‍तालुक्यातील वृक्षप्रेमी नागरिक सामील झाले. शहरातील पाच ओपन स्पेस हरित करून सुमारे तीन हजार झाडांची लागवड व त्यांच संवर्धन समितीच्या माध्यमातून मागच्या वर्षभरात करण्यात आले. या कार्याला एक वर्ष पूर्ण होऊन समितीने लावलेल्या पहिल्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अजितदादा कुंकुलोळ,सचिन वायकुळे,संजय बारबोले,गणेश गोडसे,नगरसेवक विजय चव्हाण समितीचे अध्यक्ष उमेश काळे, अतुल पाडे,दिपक गुंड,शशिकांत धोत्रे,उदय पोतदार,सुधिर वाघमारे,सुधीर खाडे,भगवान जाधव,वैभव पाटिल, संपतराव देशमुख, सचिन शिंदे, प्रफुल्ल गोडसे,बाबासाहेब बारकुल,अमित झांबरे,आण्णा पेटकर स्वप्निल पांडे,योगेश गाडे,राहुल काळे,अक्षय घोडके,अमृत खेडकर,नलवडे सर,अमित देशमुख,सयाजी गायकवाड,उमाकांत ठोकळ,रुषिकांत पाटील,राणा देशमुख,सुमित जगदाळे,अक्षय गुंड हे उपस्थित होते.या वेळी अजीत कुंकुलोळ,सचिन वायकुळे,सुधिर खाडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व समितीच्या कार्याचा गौरव करुन पुढिल कार्यास सुभेच्छा दिल्या.यावेळी उदय पोतदार यांनी झांडांची प्रार्थना म्हणली. प्रास्ताविक अतुल पाडे व सुत्रसंचालन सुधिर वाघमारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *