fbpx

बार्शी तालुका महा-ई-सेवा केंद्र संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद मस्के यांची बिनविरोध निवड

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुका महा-ई-सेवा केंद्र संघटनेच्या अध्यक्षपदी अवनी महा-ई-सेवा केंद्राचे संचालक विनोद मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार काझी, गणेश शिंदे, सोमनाथ कोल्हे, अजित शिंदे, गणेश फुले, बालाजी वीर, लक्ष्मण वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजना गावातील घरापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच नागरिकांना आपल्या गावातच उत्पन्न दाखला, जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाईल असे अनेक दाखले ऑनलाइन पद्धतीने एकाच छताखाली मिळावे म्हणून महा-ई-सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली. तालुक्यात  जवळपास ७० महा-सेवा केंद्र असतील, त्यातील ४० केंद्राची माहिती संघटनेशी जोडली गेलेली आहेत. राहीलेली केंद्रे संघटनेशी जोडून घेऊन गावातील शेवटच्या घटकापर्यंत ऑनलाईनच सेवा देण्याचा मानस नूतन अध्यक्ष विनोद मस्के यांनी प्रसंगी बोलून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *