fbpx

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022: राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स संपला! निकाल जाहीर

कुतूहल न्यूज नेटवर्क
Rajya Sabha Election Result :
राज्यसभा निवडणूक निकाल मतदानानंतर तब्बल नऊ तासांनी हाती लागला. त्यात या निवडणुकीत भाजपचे तीन, तर शिवसेनेचा एक, राष्ट्रवादीचा एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झालाय. त्यात पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळाली.

शुक्रवारी मतदान झाले. मात्र, संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला (Counting) सुरुवात होणार होती. मात्र भाजप आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांच्या काही आमदारांच्या मतावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे निकाल मध्यरात्री लागला. मात्र, महत्वाची बाब म्हणजे भाजपनं घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचं मत बाद ठरवण्यात आलं. तर उर्वरित 284 मतं वैध ठरवण्यात आली.

पहिल्या पाच जागांचा निकाल अपेक्षेप्रमाणेच
भाजपचे दोन तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी उमेदवार विजयी होणार यात कुठलीही शंका नव्हती. मात्र, शिवसेने आणि भाजपकडून सहाव्या जागेसाठी देण्यात आलेल्या उमेदवारापैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचंसह देशाचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत शिवसेनकडून संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती.

कुणाला किती मते?

  1. प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस- 43
  2. इम्रान प्रतापगढी, काँग्रेस – 44
  3. संजय राऊत, शिवसेना – 41
  4. पियुष गोयल, भाजप – 48
  5. अनिल बोंडे, भाजप – 48

सहाव्या जागेवर कुणी मारली बाजी?

  1. धनंजय महाडिक, भाजप – 41
  2. संजय पवार, शिवसेना – 33

सहाव्या जागेसाठी भाजपकडूनही कोल्हापूरचे धनंजय महाडिकांना तर शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. यादोघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय.

 

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *