कुतूहल न्यूज नेटवर्क
माहिती अधिकारानुसार माहिती देण्यास टाळाटाळ ; खाजगी संस्था आहे असे कारण देऊन माहिती देण्यास टाळाटाळ
बार्शी : श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगाव ता. बार्शी ही संस्था माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार, खाजगी संस्था आहे असे कारण देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करतात असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते भास्कर काकडे यांनी केला आहे.
भास्कर काकडे यांनी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगाव या संस्थेस दिनांक १६ मार्च २०२० रोजी माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती विचारली होती पण संस्थेने ३० दिवसात माहिती दिली नसल्यामुळे त्यांनी प्रथम अपीलीय अर्ज संस्थेकडे सादर केला होता.संस्थेने त्याना असे पत्र पाठवले की लॉकडॉन असल्यामुळे झेरॉक्स दुकाने बंद आहेत, दुकाने उघडल्यानंतर तुम्हाला माहिती दिली जाईल नंतरही त्यांना असे पत्र आले की आमची संस्था खाजगी आहे, त्यामुळे आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू होत नाही.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगांव (F२६) या संस्थेकडे ४६५ एकर जमीन आहे, ४ अनुदानित हायस्कूल, ३ अनुदानित वस्तीगृह, एक खाजगी आयटीआय, कृषी विद्यालय, इंग्लिश मीडियम, पंचायत राज ट्रेनिंग सेंटर तसेच संस्थेच्या मालकीची १०० च्या आसपास गाळे भाडेतत्वावर देण्यात आलेले आहेत. अशा अनेक विविध मार्गाने संस्थेस उत्पन्न मिळत आहे. तरीही ही संस्था खाजगी आहे, असे उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती अधिकारी कार्यकर्ते भास्कर काकडे यांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे त्यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सोलापूर यांच्याकडे सदरील संस्थेची चौकशी करावी अशी लेखी तक्रार दिलेली आहे.