fbpx

पंढरपूर नगर परिषदेने घेतली सामाजिक कार्याची दखल

कुतूहल न्यूज नेटवर्क

पंढरपूर प्रतिनिधी / विजयकुमार मोटे : कोरोना या रोगामुळे लाॅकडाउन करण्यात आले होते आणि या कालावधी मध्ये विविध सामाजिक संस्था, व्यक्ती यांचा पंढरपूर नगरपरिषदेने त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याची दखल घेत प्रशस्ती पत्र देवून सन्मान केला .

यामध्ये किशोरराजे कवडे( तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पॅरामेडिकल ) यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेवून त्यांना पी.पी.ई कीट चे वाटप केले होते.तसेच मधुकर फलटणकर (शहराध्यक्ष ओबीसी काँग्रेस ) यांनी लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या गरजुंची अन्नाची सोय केली होती.

किशोरराजे कवडे व मधुकर फलटणकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत पंढरपूर नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.यावेळी विश्वजीत (मुन्ना) भोसले, अमित शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *