कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी ग्रामस्थ व ग्राहक समिती कडून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला
पांगरी : पांगरी ता बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करून ग्रामस्थांनकडून सन्मान करण्यात आला.कोरोनाच्या या जागतिक संकटात स्वत:चे जीव धोक्यात घालून आरोग्य विभाग काम करत आहे, त्या बद्दल कृतज्ञता म्हणून ग्रामस्थ व ग्राहक समिती तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,वैद्यकीय अधीक्षक रवींद्र माळी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट,नेत्रचिकित्सा अधिकारी ए के शिंदे,ग्राहक समिती तालुकाध्यक्ष विष्णू पवार, जेष्ठ पत्रकार तात्या बोधे,डॉ विलास लाडे,रामचंद्र मोरे,अमोल नांदेडकर,कल्याण निंबाळकर आदीं मान्यवर उपस्थित होते.