कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी : सध्या बार्शी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.त्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी सहजीवन संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे यांच्या तर्फे पांगरीतील ग्रामीण रुग्णालयाला पीपीई किट देण्यात आले.
सहजीवन संस्थेतर्फे पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयाला पीपीई किट देण्यात आले
यावेळी वैद्यकीय अधिक्षक रवींद्र माळी, पत्रकार गणेश गोडसे,ग्रामपंचायत लिपिक उमेश गाढवे,हवालदार सतिश कोठावळे,मनोज जाधव, पत्रकार शोएब बागवान,पत्रकार इर्शाद शेख आदीं मान्यवर उपस्थित होते.