कुतूहल न्यूज नेटवर्क
आज पालकमंत्र्यांचा आषाढीवारी व कोरोना परिस्थिती विषयक पंढरपूर आढावा दौरा
पंढरपूर प्रतिनिधी (विजयकुमार मोटे )- भारतात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले पंढरपुर हे धार्मिक क्षेत्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुर येथे दर वर्षी आषाढी वारी भरत असते. विठ्ठलभक्तांची दर्शनासाठी खुप मोठी गर्दी असते. जनावरांचा मोठा बाजार येथे भरत असून या वारीत खुप मोठी आर्थिक उलाढाल होत असते.
या वर्षीच्या आषाढीवारी वर कोरोनाचे सावट आहे.1जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त कोरोना विषयास अनुसरुन कोण कोणते निर्णय घेण्यात यावेत याविषयी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज पंढरपुर येथिल शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत सकाळी 11:30 मि.वाजता आढावा बैठक घेणार आहेत.25 जुन पासून पंढरपूर बंद ठेवण्यात येईल अशी अफवा पसरली होती. तसेच मागील एकादशीला काही वारकरी गुपचुप वारी पोहोच करण्यासाठी आले होते. त्यांना क्वारंटानही केले होते.त्यामुळे या बैठकीत कोण कोणते निर्णय घेण्यात येतील यावर सर्वांचे लक्ष आहे.